Mumbai Water Stock Yandex
मुंबई/पुणे

Mumbai Water Stock: मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट; पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा

Mumbai Water Shortage News: मुंबईशहर वासियांना येत्या काही दिवसांत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बई शहरासह उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीनुसार २३ मे २०२४ या दिवसापर्यंत पाणीसाठा तब्बल १० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. साधारण गेल्या तीन वर्षातील पाणीसाठ्याने ही नीचांक पातळी गाठली आहे. पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंबई (Mumbai) महानगरपालिकेने मुंबईला होणाऱ्या सात तलावांतील संपूर्ण पाणीसाठ्याचा आढावा घेतला. बीएमसीने घेतलेल्या आकडेवारीनुसार, २३ मे २०२४ रोजी मुंबईचा संपूर्ण पाणीसाठी १०.२८ टक्के होता तर २०२३ मध्ये याच दिवशीचा पाणीसाठी साधारण १५.९९ टक्क्यापर्यंत होता. मात्र पाणीसाठ्याचे प्रमाण पाहता कोणतीही पाणी कपात लागू होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सात तलावांमधील सध्याचा पाणीसाठा येत्या ३१ जुलै महिन्या अखेरीसपर्यंत पुरेल असा आहे. मात्र पाणीपुरवठ्याचा योग्य वापर आणि पाणी उपाययोजनाची पधद्ध या सर्वांबाबत मुंबई महानगरपालिकने योग्य नियोजन केले आहे. तरीही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा पाणीसाठ्याचा नव्याने संपूर्ण आढावा घेण्यात येईल,असं मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मे महिन्याच्या सुरुवातीस, राज्य सरकारच्या असलेल्या पाटबंधारे विभगाने भातसा धरणातून तब्बल १,३७ लाख एमएलडी तसेच अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० लाख एमएलडी इतका पाणीसाठा(water-storage) वापरण्याची मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीला मंजूरी दिली होती.

पाणी कपात ?

मुंबईसह अन्य भागात जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी म्हटले की, सध्याचा पाणीसाठी हा मान्सून येईपर्यंत टिकू शकेल. त्याचमुळे सध्या मुंबईत पाणी कपात करण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT