mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ऐन पावसाळ्यात मुंबईत ११ तासांचा पाणीपुरवठा बंद, कधी अन् कुठे?

Mumbai Water Shortage update : ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे अंधेरी आणि इतर भागातील लोकांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागणार आहे. मुंबईच्या अंधेरी वर्सोवा भागात ११ पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा येथील पाईपलाईनचे व्हॉल्व्ह बदलणे आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाईपलाईनच्या दुरुस्तीमुळे मुंबईकरांना जपून वापरावं लागणार आहे.

दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी दुपारी दोन ते शुक्रवारी पहाटे एक वाजेपर्यंत असा एकूण ११ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाने पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या कामामुळे के-पश्चिम वॉर्डमधील अंधेरी, जुहू, विलेपार्ले - पश्चिम, जुहू, चार बंगला सात बंगला भागातील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील अनेक भागात गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अंधेरी पश्चिमेकडील गोपाळ कृष्ण गोखले पुलाखालील जल वाहिनीवरील १३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप दुरुस्ती आणि वर्सोवा जलवाहिनीवरील 900 मिलिमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्होल्व्ह आणि बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कामाला गुरुवारी १९ जून रोजी दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. दुरुस्तीचं काम किमान 11 तास चालणार आहे. त्यामुळे शुक्रवार 20 जून रोजी मध्यरात्रीपर्यंत या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

जेवीपीडी स्कीम, मोरा गाव, जुहू गावठाण, विलेपार्ले पश्चिम, लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मिलन भुयारी मार्ग, जुहू, विलेपार्ले, जुहूगावठाण, गिल्बटिल, अंधेरी पश्चिम, जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर शेट्टी सोसायटी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Gaikwad Breaking : मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींनी काळं फासलं

Air India Plane Crash: विमानाचे इंधन स्विच कसं बंद झालं? तज्ज्ञाने व्यक्त केला संशय

Loco Pilot Salary: ट्रेन ड्रायव्हर म्हणजे लोको पायलटचा पगार किती असतो?

Maharashtra Live News Update : - भात लावणीच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साक्री तालुक्यामध्ये अद्यापही भात लावणीला सुरुवात नाही

उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची केस आता कोण लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT