mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : सॉरी, मम्मी पप्पा! मित्राने घात केला अन् सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकला; तरुणाने संपवलं जीवन

Mumbai Latest News : मुंबईच्या वडाळ्यातील २७ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. मित्राच्या कृत्यामुळे तो सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं होतं.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

mumbai News : मुंबईच्या वडाळ्यातील तरुणासोबत भयंकर प्रकार घडला आहे. मुंबईच्या वडळा येथे राहणाऱ्या तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या २७ वर्षीय तन्मयला सेक्स रॅकेट प्रकरणात चौकशीला बोलवलं. त्यानंतर घाबरलेला तन्मय पोलीस स्टेशनमधून पळून गेला. याच तन्मयने गुरुवारी जीवन संपवलं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वडाळा येथे राहणारा २५ वर्षीय सचिन करंजे हा मुलींना कामाला लावण्याच्या नावाखाली त्यांना लॉजवर घेऊन जात असतं. त्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅक मेल करत असे. अनेक मुलींसोबत त्याने असे प्रकार केले. अखेर एका मुलीने याबाबत तक्रार वडाळा पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सचिन करंजे याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

सचिन हा त्याचा वडाळ्यातील प्रतीक्षा नगर परिसरात राहणारा मित्र २७ वर्षीय तन्मय केणी याचं आधारकार्ड वापरून मुलींना लॉज घेऊन जात होता. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी पोलिसांनी सचिनला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. याच प्रकरणी १७ डिसेंबर रोजी तन्मय केणी याला पोलिसांनी चौकशीसाठी वडाळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. याचवेळी तन्मय पोलीस स्टेशनमधून पळून गेला. तन्मय हा १० दिवस फरार होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यात सुरुवात केली. त्यानंतर गुरुवारी मुलुंड येथील छेडा नगर पेट्रोल पंपाजवळ तन्मयने स्वत:च्या हाताची नस कापलेल्या बेशुद्ध अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

तन्मय ज्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी सापडली. तन्मयने या चिठ्ठीत सचिन करंजे याच्या नावाचा उल्लेख केला होता. 'मला सचिनने फसवले. तो मला ब्लॅकमेल करत आहे. त्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. त्याला फाशी झाली पाहिजे. सॉरी मम्मी पप्पा, असे तन्मयने चिठ्ठीत नमूद केले. या प्रकरणी वडाळा आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT