governor bhagat singh kosjyari-uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

राज्यपाल-मविआ सरकार संघर्ष पेटणार, कोश्यारींकडून मुंबई विद्यापीठ कुलगुरु नेमणूक प्रक्रियेला सुरुवात

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु निवडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पेटणार असल्याचं चित्र राज्यात दिसू लागलंय. कारण, राज्य सरकारच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे (Mumbai University Vice Chancellor appointment process begins by Governor Bhagat Singh Koshyari).

राज्य सरकारने (Mahavikas Aghadi Government) बनवलेल्या विद्यापीठ कायद्याकडे दुर्लक्ष करत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सरकारच्या विद्यापीठ कायद्यानुसार समिती स्थापन करुन ती समिती नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात येणार आहे. पण, या कायद्यावर राज्यपाल यांनी सही केली नाही.

दुसरीकडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु (Vice-Chancellor) निवडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पुन्हा पेटणार हे निश्चित आहे.

कुलगुरु नेमण्याचा अधिकार सरकारकडे

विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार एकप्रकारे राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, राज्यपालांचे अधिकार अबाधित राहतील, असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला होता. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जातील. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागेल, अशी ही प्रक्रिया आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरीही देण्यात आली होती.

मात्र, याकडे राज्यपालांनी पूर्णपणे दुर्लक्ष करत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि राज्यपालांमधील वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT