Aaditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

MU Senate Election : मुंबईचा किंग कोण? सिनेट निवडणूकीत ठाकरेंचा डंका; महायुतीच्या मुंबईतल्या आमदारांचं टेंशन वाढलं?

Mumbai University Senate Elections 2024 : तब्बल दीड वर्षे लांबलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाने सर्वच जागा खिशात घातल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा ठाकरेंचीच असल्याची चर्चा रंगलीय. तर दुसरीकडे महायुतीच्या आमदारांचं टेंशन वाढलंय. त्याचं नेमकं कारण काय आहे?

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाने एक हाती विजय मिळवला आहे. यानंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर एकच जल्लोष करण्यात आला.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकत भाजप आणि शिंदे गट समर्थित अभाविपचा धुव्वा उडवलाय. मात्र ही तर सुरुवात आहे. हा गुलाल विधानसभेतही उधळायचा आहे, असा निर्धार आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांसमोर केला.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मुंबईतील 3 जागांवर ठाकरेंनी निर्विवाद वर्चस्व तर 1 जागेवर निसटता पराभव झाला होता. तर काँग्रेसने 1 जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीतील मतदानानुसार महाविकास आघाडीनं 36 पैकी 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतलीय. तर महायुतीला केवळ 15 जागांवर आघाडी मिळालीय. यातच मुंबईतलं सध्याचं पक्षनिहाय आमदारांचं बलाबलबद्दल माहिती जाणून घेऊ...

मुंबईतील सध्याचं बलाबल

  • भाजप- 16

  • शिंदे गट- 6

  • ठाकरे गट- 8

  • काँग्रेस- 4

  • अजित पवार गट- 1

  • समाजवादी पक्ष- 1

विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुक, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाने विजय मिळवला. त्यातच आता सिनेट निवडणूकीतही ठाकरे गटाने पैकीच्या पैकी जागा जिंकत आपलं वर्चस्व कायम राखलंय..पदवीधर आणि शिक्षित मतदाराने ठाकरेंना कौल दिलाय. त्यामुळे महायुतीच्या आमदारांची धाकधूक वाढलीय..मात्र विजयाचा हाच स्ट्राईकरेट कायम राहिल्यास विधानसभेलाही ठाकरेच मुंबईचे किंग ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT