Mumbai Real Estate Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Real Estate : घरांच्या विक्रीत मुंबई नंबर १, वाढत्या किंमतींनंतरही विक्रीचा आलेख चढता

Mumbai News : मुंबई घरांच्या विक्रीत नंबर १ ठरली आहे. मुंबईत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल २४ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. मागील तीन महिन्यांपेक्षा २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत जुलै ते सप्टेंबर दरम्यान तब्बल २४ हजारांहून अधिक घरांची विक्री नोंदवली गेली

  • गेल्या तीन महिन्यांत घरविक्रीत २ टक्क्यांची वाढ झाली असून

  • विकसकांनी नवीन प्रकल्प कमी केले तरी मात्र मागणी कायम राहिली आहे

  • नाइट फ्रॅंकच्या अहवालानुसार मुंबई अजूनही देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट बाजारपेठ ठरली

मुंबईसह एमएमआर क्षेत्रात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात स्थावर मालमत्ता क्षेत्राला दिलासादायक ठरली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तब्बल २४ हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली. मागील तिमाहीच्या तुलनेत दोन टक्के वाढ झाली असून घरविक्रीत मुंबई अव्वल आहे. तसेच पुणे, बंगळूर या शहरांत या कालावधीत घरविक्रीत मोठी घट झाली आहे.

मुंबई हे शहर झमगत आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना आकार देणार शहर आहे. हजारो लोक या शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी दाटीवाटीने राहतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहेत. मोठं मोठ्या कंपन्या मुंबई शहरात स्थिरावत आहेत. अशा मायानगरी शहरात घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असत. मात्र ते घेणं प्रत्येकाला परवडत नाही. कारण या घरांच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील घरांच्या विक्रीचा चढता आलेख कायम असल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे.

एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल २२ हजार १०५ घरांची विक्री झाली होती. त्यांनतर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात दोन टक्के वाढ झाली आहे. मुंबई शहराने सर्व बाजारपेठांच्या तुलनेत रहिवासी घरांच्या विक्रीत वाढ नोंदवलेली असतानाच ऑफिस मार्केटमध्ये सरासरी व्यावहारिक भाड्यातही दोन अंकी वाढ नोंदवली आहे.

मुंबईत घराची विक्री वाढत असली तरी मागील तीन महिन्याचा विचार करता नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याबाबत विकसकांनी सावध भूमिका घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केवळ १९ हजार १४५ घरे उपलब्ध केली आहेत. दरवर्षीपेक्षा ती १९ टक्क्यांनी कमी आहेत. बंगळूर, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये तुलनेने जास्त घरे उपलब्ध केल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : पुणे हादरलं! शाळेतील मुलीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं, ५० वर्षाच्या नराधमाने केले घाणेरडं कृत्य

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

SCROLL FOR NEXT