Nitesh Rane on Mumbai Water Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Metro: मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो; २१ स्टेशन, कुठून ते कुठपर्यंत धावणार?

Minister Nitesh Rane On Mumbai Water Metro: मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. या वॉटर मेट्रोसाठी २१ स्थानके असणार आहेत. ही वॉटर मेट्रो कुठून ते कुठपर्यंत धावणार हे घ्या जाणून....

Priya More

Nitesh Rane: महाराष्ट्र सरकार लवकरच मुंबईत वॉटर मेट्रो सेवा सुरू करणार आहे. मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शहरातील जलमार्गांचा वापर करून रस्ते आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'केरळच्या कोची वॉटर मेट्रोला या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस हा डीपीआर तयार होण्याची शक्यता आहे.'

मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात ५०-५० भागीदारीसह वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी एक विशेष संस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई सात बेटांनी बनलेली आहे. परंतु तिच्या जलमार्गांचा कधीही पूर्णपणे वापर झालेला नाही. आता वॉटर मेट्रो सेवेमुळे रस्ते आणि उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील गर्दी कमी होणार नाही तर शहरी वाहतूक व्यवस्थेतही मोठी सुधारणा होईल.'

नितेश राणे यांनी पुढे सांगितले की, 'या नवीन वॉटर मेट्रो प्रणालीमुळे रस्ते आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होईल आणि वाहतूक कोंडी देखील कमी होईल. वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे शहरी वाहतूक सुधारेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीत पर्यटनाला चालना मिळेल.' बॅटरीवर चालणाऱ्या फेरींचा समावेश असलेल्या या वॉटर मेट्रो प्रकल्पाचा उद्देश मुंबई महानगर प्रदेशाच्या विविध भागांना जोडणे हा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारतातील पहिली यशस्वी वॉटर मेट्रो तयार करण्यात आली. जी महाराष्ट्र सरकारला या उपक्रमात मदत करत आहे.

हा प्रकल्प दोन टप्प्यात तयार केला जाईल असं सांगताना नितेश राणे म्हणाले की, 'वैतरणा नदी, वसई, ठाणे, मनोरी, पनवेल आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात वॉटर मेट्रो स्टेशनसाठी २१ संभाव्य स्थानके प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प २ टप्प्यात तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात रो-रो (रोल ऑन-रोल ऑफ) फेरी सेवा देखील सुरू केली जाईल. महत्वाचे म्हणजे ही वॉटर मेट्रो सेवा अनेक प्रमुख मार्गांना व्यापणार आहे. ज्यामध्ये नारंगी-खरवदेश्वरी, वसई-मीरा भाईंदर आणि वाशी-डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

नवी मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल जिथून वॉटर मेट्रो सेवा सुरू होईल. विमानतळाजवळ वॉटर मेट्रो टर्मिनल बांधण्याचा प्लान आहे. यासंदर्भात सिडको, महाराष्ट्र सागर मंडळ आणि राज्य बंदर मंत्रालय यांच्यात लवकरच बैठक देखील होईल. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. या प्रकल्पामुळे मुंबईतील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT