CNG Price Hike Saam Tv
मुंबई/पुणे

CNG Price Hike : प्रवास महागणार! CNG च्या किंमती अचानक वाढल्या, वाचा नवे दर काय?

MGL CNG Rates : मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एमजीएलच्या नव्या दरांमुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांचा प्रवास खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai CNG price increased today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच अचानक मध्यरात्री सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. मुंबई, पुण्यापासून सर्वच शहरातील आजपासून सीएनजीच्या किंमतीत २ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या संघार्षामुळे जगभरात महागाईने उच्चांक गाठलाय. त्याच पार्श्वभूमीवर दररोज महागाईचा भडका उडत असल्याचे चित्र आहे. भारताकडून यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. जागितक बाजारात रूपयांची घसरण आणि कच्चे तेल महागल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किरकोळ दरात प्रति किलो २ रुपयांची दरवाढ जाहीर केली. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. ८२ रूपये प्रति किलो मिळणारा गॅस आता ८४ रूपयांना मिळणार आहे. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) प्रवासी आणि सार्वजनिक वाहतूक चालकांना आता अधिक प्रवास खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ होईल, त्यामुळे शहरात आणि आसपासच्या परिसरात सुधारित दर प्रति किलो ८४ रुपये होईल, असे एमजीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीएनजीच्या या दरवाढीचा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. रिक्षा, टॅक्सीकडून दरवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एमएमआरमध्ये सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये अंदाजे ४,७०,००० ऑटोरिक्षा, १,६०,००० हून अधिक टॅक्सी आणि ५,००,००० पेक्षा जास्त खाजगी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास यानंतर वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT