वंदे भारत ट्रेनला पुण्याजवळ अपघात झाला. पुणे रेल्वे स्थानकात येत असताना वंदे भारत ट्रेनचा डबा रुळांवरून घसरला. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. ही वंदे भारत ट्रेन सीएसएमटी मुंबई स्टेशनवरून सोलापूरकडे जात असताना हा अपघात घडला.
वंदे भारत ट्रेनचा डबा घसरल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकाजवळ घडली. ही वंदे भारत ट्रेन CSMT मुंबईवरून सोलापूरकडे जात होती. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही ट्रेन आली असतानाच डबा रुळांवरून घसरला. पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर ही ट्रेन जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.
दररोज संध्याकाळी सव्वासात वाजता पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन येत होती. आज नियमित वेळेनुसार वंदे भारत ट्रेन पुणे स्थानकात येत होती. त्याचवेळी फलाट क्रमांक तीनवर ती येत असताना ट्रेनचा डबा रुळांवरून घसरला.
ट्रेनची चाके रुळांवरून खाली घसरल्याचे दृश्यांमधून दिसते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. रुळांवरून घसरलेला डबा बाजूला करण्याचे काम सुरू आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारतमधील प्रवाशांसाठी सोय केली जाणार आहे. लवकरच नवीन ट्रेन सोलापूरला जाण्यासाठी येणार आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाने विनंती केली आहे. नवीन गाडी थोड्याच वेळात सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी दाखल होणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ३ वगळता इतर प्लॅटफॉर्म वरील सेवा सुरळीत सुरू आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा एक डबा घसरल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. सुदैवाने तात्काळ रेल्वे पोलीस तसेच कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना इंजिनच्या डब्यातून खाली उतरवलं. जवळपास एक ते दीड तास खोळंबून बसलेले प्रवासी जेव्हा खाली उतरले. तेव्हा त्यांनी सुकवणारा क्षण अनुभवला. यावेळी ट्रेनमधून सुखरूपपणे खाली उतरवल्यानंतर एका चिमुकल्याने रेल्वे जवानाला "थँक यू" म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.