मनोज तांबे, साम टीव्ही प्रतिनिधी
Nalasopara Pelhar murder case beheaded body investigation details : नालासोपाराच्या पेल्हार येथील किराणा दुकानाच्या व्यवसायातील आर्थिक वादातून साथीदाराची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून धारदार शस्त्राने वार करत शीर वेगळे केले होते. मृतदेह पेल्हारमधील आंब्याच्या वाडीत फेकून होते तर डोके तानसा नदीत टाकण्यात आले होते. अशोक सिंग राजपूत (३२, रा. राजस्थान) अशी मृतदेहाची ओळख पटली असून तो आरोपींचा मित्र होता. या प्रकरणाचा अवघ्या आठ तासांत छडा लावत पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन आरोपींना अटक केली असून आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दिनेशकुमार प्रजापती (२७) त्याचा साथीदार संदीप तिवारी (३५) असे या दोन आरोपींची नावे आहेत.
पेल्हार परिसरात शीर नसलेल्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अवघ्या आठ तासांत छडा लावत पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन आरोपींना अटक केली. ३० मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सोपारा फाटा परिसरातील एका आंब्याच्या वाडीत झाडाझुडपात प्लास्टिकच्या गोणीत भरलेला शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीची ओळख अशोक सिंग राजपूत (३२, रा. राजस्थान) अशी पटली असून तो आरोपींचा मित्र होता. मृतदेहावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत होते. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील २०० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. संशयित वाहनांचा मागोवा घेत तपास सुरू असताना दिनेशकुमार प्रजापती (२७) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार संदीप तिवारी (३५) याच्यासह खून केल्याची कबुली दिली. किराणा व्यवसायातील आर्थिक वादातून आरोपींनी धारदार शस्त्राने त्याचा खून केला. ओळख पटू नये यासाठी त्यांनी मृताचे शीर वेगळे करून मृतदेह पेल्हारमधील आंब्याच्या वाडीत फेकला, तर शीर तानसा नदीत टाकले.
पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवून नदीकिनारी झाडाझुडपात गुंडाळलेल्या अवस्थेत शीर व मोबाईल जप्त केला. दोन्ही आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.