Sanjay Raut Warrant SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Warrant : संजय राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट; काय आहे प्रकरण?

Sanjay Raut : संजय राऊत हे सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं सोमय्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

Court Issued Non Bailable Warrant Against Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईतील शिवडी कोर्टानं अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सोमय्या दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून, संजय राऊत हे सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं सोमय्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सोमय्यांच्या वकिलांनी वॉरंट जारी करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर सोमय्या यांनी शिवडी कोर्टात धाव घेऊन राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.

कोर्टात काय झालं?

संजय राऊत हे वारंवार कोर्टात सुनावणीला गैरहजर राहत असल्यामुळे सोमय्या यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यावर राऊतांच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला. त्यावर जोपर्यंत कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात येत नाही, तोपर्यंत राऊत हजर होणार नाहीत, असा युक्तिवाद केला.

राऊतांच्या वकिलांनी वेळ मागितला होता. कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. तर सोमय्यांच्या वकिलांनी राऊतांविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

शिवडी कोर्टानं आज, शुक्रवारी राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केला आहे. ते सुनावणीला वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे कोर्टानं वॉरंट काढला आहे. मेधा सोमय्या यांना न्याय मिळेल, असा विश्वासही किरीट सोमय्यांनी व्यक्त केला. यावेळी सोमय्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊत न्यायालयात येण्यास घाबरतात का? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT