redelopment  Saam tv
मुंबई/पुणे

Self-redevelopment in Mumbai : रिडेव्हल्पमेंटसाठी बिल्डरकडे जात असाल तर थांबा; स्वत: विकासक व्हा, मोठं घर मिळवा, वाचा सविस्तर

Affordable housing through redevelopment : तुमची सोसायटी जुनी झाली असेल आणि रिडेव्हल्पमेंटसाठी तुम्ही बिल्डरकडे जात असाल तर थांबा...कारण स्वत: विकासक झालात तर तुम्हाला आणखी मोठं घर मिळू शकतं. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट...

Girish Nikam

आपलं स्वत:चं मोठं घर असावं हे सगळ्यांच मोठं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. तुमची इमारत जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डर शोधत असाल तर जरा थांबा... कारण आता तुम्ही स्वत: तुमच्या इमारतीचा विकास करु शकता. मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग य़शस्वी झाला आहे. आणि दहापट मोठं घरही मिळालं आहे.

विलेपार्ले पूर्वेकडील नंददीप को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी स्वत:च करून नवा पायंडा घातला. 10 मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्रीही केली. हा स्वयंपूर्णविकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खाजगी बँकेकडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने आणि इमारतीतील तीन घरं विक्री करून करण्यात आला आहे.

मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांना चाव्या सूपूर्द करण्यात आल्या. अवघ्या अडीच वर्षात सोसायटीतील सभासदांना आपल्या हक्काचे पहिल्या पेक्षा मोठं घर मिळालंय. सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे पूर्वी 400 चौरस फुटाच्या घरात राहणारे आता 1400 चौरस फुटांच्या घरात राहण्यास जात आहेत.

1) घनश्याम सोमपुरा, अध्यक्ष, नंददीप सोसायटी

2) सुवर्णा खानविलकर, घर खरेदीदार

अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी पहायला मिळते. ग्राहकांची लूट होते. ग्राहकांना दिलेली आश्वासने कागदावरच राहतात. मात्र विले पार्लेमधील नंददीप सोसायटीने बिल्डरला टाळून विकसीत केलेली ही इमारत आता शहरातील इतर सोसायट्यांनाही खुणावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT