Mumbai Santacruz Fire: A Huge Fire Broke At Commercial Complex At Santacruz Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Santacruz Fire: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये व्यापारी संकुलाला आग, अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी

Fire at Santacruz, Mumbai: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग लागल्याची घटना घडली आहे. संकुलाच्या तळघाराला ही आग लागली आहे. या संकुलात काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Fire Broke Out at Santacruz:

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग लागल्याची घटना घडली आहे. संकुलाच्या तळघाराला ही आग लागली आहे. या संकुलात काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सांताक्रूझ पश्चिम भागातील एका व्यापारी संकुलात आग लागल्याची घटना घडली आहे. ऑप्शन कमर्शिअल सेंटरच्या तळघरात ही आग लागली आहे. या आगीत काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यापारी संकुलाच्या तळघाराला लागलेली आग लेव्हल वनची आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, इलेक्ट्रिसिटी कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

तळघरासोबतच दुसऱ्या माळ्यावर असलेल्या एका गाळ्याला आग लागली आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळावर 4 फायर इंजिन दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT