Mumbai News  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Viral News: माणुसकीचा गारवा! रिक्षावाल्याच्या कृतीने जिंकली मुंबईकरांची मने; प्रवाशांसाठी चक्क फुकटात देतोय...

Mumbai RikshaDriver Viral News: रिक्षावाल्याने दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे..

Gangappa Pujari

Mumbai Viral News: रिक्षावाले म्हणले की अरेरावी, फसवाफसवी असेच अनुभव अनेकांना आलेले ऐकायला मिळतात. रिक्षावाल्यांविरोधातील तक्रारींचा पाढा अनेकदा ऐकायला मिळतो. कधी सुट्ट्या पैश्यांवरुन तर कधी मीटरवरुन हे रिक्षावाले प्रवाशांशी वाद घालत असतात. मात्र सध्या एका रिक्षावाल्याने दाखवलेल्या माणुसकीने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) या रिक्षावाल्याच्या माणुसकीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे, काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत. उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. अशातच प्रत्येकाला उन्हातून फिरताना, प्रवासा दरम्यान थंड पाण्याची आवश्यकता भासतेच. हीच गरज ओळखून या रिक्षाचालकाने प्रवाशांसांठी खास सोय केली आहे.

हा रिक्षावाला आपल्या रिक्षात प्रवाशांच्या सोईसाठी पाण्याच्या बाटल्या ठेवतो, तेही कोणताही मोबदला न घेता, एकदम फुकट. भर उन्हाळ्यात मुंबईच्या (Mumbai News) या रिक्षावाल्याने दिलेला हा माणुसकीचा गारवा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्विटरवर (Twitter) या रिक्षावाल्याचा फोटो शेअर करण्यात आला असून माणूसकीचा गारवा! रिक्षावाल्याच्या दिलदारपणाने जिंकले मन; कधी सुट्ट्या पैशांसाठी, कधी मीटरवरुन भांडणाऱ्या रिक्षावाल्यांपेक्षा या मुंबईच्या रिक्षावाल्याने दाखवलेली माणूसकी कौतुकास्पदच! असा सुंदर कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे. नेटकऱ्यांनीही या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT