Mumbai Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Update : काळजी घ्या! काम असेल तरच घराबाहेर निघा; मुंबईत पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update News :मुंबईत पुढील २४ तास अतिमुसळधार पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने काम असेल तरच घराबाहेर निघा, असं आवाहन केलं आहे.

Vishal Gangurde

सूरज मसूरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत पहाटेपासून मुसळदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावासाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. लोकल सेवा उशिराने धावत आहेत. झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या कोसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. तर मुंबईत पुढील २४ तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना फटका बसला आहे. मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पाऊस होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. या मुसळधार पावसानंतर दुकान आणि झोपडपट्ट्यांतील घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. अंधेरी सबवेत ५ फुटापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसात मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना मोठी अडचण होत आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना महत्वाचे आवाहन केलं आहे. भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने मुंबईला शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पालिकेने असेल तरच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केलं आहे.

दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे काही विभागात झाडे कोसळल्याची घटना घडली आहे. भांडूपच्या तलाव रोड परिसरात रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. परंतु रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मातोश्री, कलानगर बाहेरील इमारतीच्या संरक्षण भींतीवर झाड कोसळल्याची घटना घडली. आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच घटनास्थळी पोहोचेचले. त्यांनी झाड हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT