मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे मोठे संकट Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे मोठे संकट

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई मध्ये मलेरिया डेंग्यू , स्वाईन फ्ल्यू , लेप्टो या पावसाळी आजारांवर रुग्ण संख्ये मध्ये महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाचे Corona हॉटस्पॉट Hotspot असलेल्या मुंबई Mumbai मध्ये मलेरिया डेंग्यू Malaria Dengue, स्वाईन फ्ल्यू Swine flu, लेप्टो Lepto या पावसाळी आजारांवर रुग्ण संख्ये मध्ये महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे मोठे संकट वाढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पावसाळी आजारांने आतापर्यंत एक देखील मृत्यू झाला नाही. तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या Municipal Corporation आरोग्य विभागाकडून Department of Health वेळोवेळी करण्यात आले आहे. २०२० मध्ये वर्षभरात मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले होते. या मध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे २४० रुग्ण आणि त्यामध्ये ८ मृत्यू झाले आहेत, डेंग्यूचे १२९ रुग्ण होते तर त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

हे देखील पहा-

गॅस्ट्रोचे २५४९, ‘एच 1एन 1’चे ४४ रुग्ण आढळले होते. यावर्षी १ जानेवारीपासूनच जुलै शेवटपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण २३१८, लेप्टोचे ९६, डेंग्यूचे ७७, गॅस्ट्रोचे १५७२ तर ‘एच1 एन1’ चे २८ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टो या रोगामुळे १ मृत्यू झाला आहे. जरवर्षी पावसाळ्यामध्ये मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. शिवाय कोरोनाचे संकट आजून देखील पूर्णपणे ओसरलेले नाही.

यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो रुग्णांची संख्येत वाढ झाल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा social distance फज्जा उडण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई मध्ये पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT