Mumbai Local Mega Block Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मुंबईकरांचा होणार खोळंबा, रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी दोन मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.

Satish Daud

Mumbai Local Mega Block News

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी दोन मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकदरम्यान लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ठाणे ते कल्याणदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते सांताक्रुझदरम्यान ब्लॉक घेतला जाईल. हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते सांताक्रुझ अप-डाउन जलद रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

दरम्यान, कल्याण दिशेला जाण्यासाठी ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे उभारण्यासाठी पाचवी-सहावी मार्गिका आणि ट्रान्सहार्बरवर शनिवारी रात्री १०.१० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. ठाणे ते पनवेल शेवटची लोकल रात्री ९.५२ वाजता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT