PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTED Saam Tv
मुंबई/पुणे

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Pune Railway Train Cancelled Update : ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेससह अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Alisha Khedekar

  • ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित

  • पुणे-मुंबई मार्गावरील डेक्कन क्वीन, इंटरसिटी आणि डेक्कन एक्सप्रेस रद्द

  • मुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्याही रद्द

  • साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस सेवेलाही फटका

राज्यात गेले ८ दिवस पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे कुठे दरड कोसळली, इमारती पडल्या, रस्ते खचले, झाडे कोसळली तर कुठे पूरपरिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान दरड कोसळल्याने पुणे-मुंबई मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांची वाहतूक आज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेली डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. दररोज मोठ्या संख्येने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी या गाड्यांमधून प्रवास करत असतात. त्यामुळे या गाड्या रद्द झाल्याने अनेकांच्या प्रवासाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

याशिवाय मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांवरही परिणाम झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यादेखील आज रद्द राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील रेल्वे प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, केवळ पुणे-मुंबई मार्गच नव्हे तर इतर काही मार्गांवरील रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी देखील आज रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिर्डी आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित रेल्वे गाडीची माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या गाड्या रद्द झाल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT