Mumbai Pune Missing Link google
मुंबई/पुणे

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट होणार; गेम चेंजर 'मिसिंग-लिंक' कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

Mumbai Pune Missing Link Open Date: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि कमी वेळेत पूर्ण होणार असून, बोगदा व उंच पूलामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई आणि पुणे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रोजच्या ट्रॅफिकमध्ये अडकून कंटाळलेल्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

मुंबई ते पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पण खंडाळा घाटातली तीव्र वळणे, ट्रॅफिक जाम आणि पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या सर्व अडचणींवर मोठ्या प्रमाणात मात होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या महाराष्ट्र दिन म्हणजेच १ मे २०२६ पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. असा अंदाज आहे. त्यामुळे लांबचा, वळणावळणाचा आणि वेळखाऊ प्रवास आता जास्त सोपा आणि जलद होणार आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पाची खास बाब म्हणजे यामध्ये उभारण्यात आलेला सुमारे २३.५ मीटर रुंदीचा भव्य बोगदा, जो जगातला सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जाणार आहे. तसेच टायगर व्हॅलीच्या परिसरात उभारण्यात आलेला सुमारे ६५० मीटर लांबीचा आणि १८२ मीटर उंचीवरचा केबल-स्टेड पूल हा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. हा पूल २०० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचा खर्च जवळपास ६,६९५ कोटी रुपयांपर्यंत झाला आहे. हा १३.३ किलोमीटरचा प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालणारा ठरणार आहे.

नव्या प्रकल्पामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल २५ ते ३० मिनिटांनी तुमचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. तसेच त्यातले अंतर जवळपास ६ किलोमीटरने कमी होईल. त्याने इंधनाचीही बचत होईल. खंडाळा घाटातली धोकादायक वळणे सुद्धा टाळता येतील. म्हणजेच आता प्रवास सुरक्षित आणि कमी वेळेत होणार आहे. सुरक्षेसाठी या मार्गावर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन सुविधा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT