Mumbai-Pune Missing Link Saam Tb
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Missing Link: मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन लांबणीवर जाणार; युद्धामुळे कामावर परिणाम

Mumbai-Pune Missing Link Innaugaration: मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. १ मे रोजी हा मिसिंग लिंक सुरु करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, युद्धामुळे मिसिंग लिंकच्या कामाला उशिर होऊ शकतो.

Siddhi Hande

मुंबई पुणे मिसिंग लिंक कधीपासून सुरु होणार?

उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता

मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे प्रवास होणार सुसाट

मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकमुळे प्रवास खूप जलद होणार आहे. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. खोल दरीवर हा पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीदेखील होणार नाही. दरम्यान, आता हे उद्घाटन आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डांबरीकरणासाठी लागणाऱ्या बिट्यूमेनच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास उशिर होऊ शकते. यामुळे कदाचित मिसिंग लिंकचे उद्घाटन पुढे जाऊ शकते.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिसिंग लिंकवरील बोगद्याचे काम पूर्ण झालं होते. त्यावरील डांबरीकरणदेखील झाले आहे. केबल-स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरचं डांबरीकरण बाकी होते. यासाठी बिट्यूमेन आवश्यक आहे. ते खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बिट्यूमेनचे दर आखाती देशातील युद्धामुळे खूप वाढले आहेत. इराण, इराक, सौदी, ओमन आणि कुवेत या देशांमधून बिट्यूमेनचा पुरवठा होतो. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे पुरवठ्याला चांगलाच फटका बसला आहे.

डांबरीकरणासाठी लागणाऱ्या मशीमधील हलक्या तेलाचाही पुरवठा कमी झाला आहे. यामुळे मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन पुणे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, २५ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या मार्गावरील टेस्टिंगदेखील ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १ मे रोजी पूल सुरु करण्याचे निर्देश आहेत. काही अधिकाऱ्यांच्या मते, मार्ग १ मेपर्यंत खुला होऊ शकते. काम थांबू नये, यासाठी कंत्राटदारांनी जास्तीत जास्त किंमती साहित्य खरेदी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT