Mumbai-Pune Expressway Two trucks Accident in borghat traffic stopped Saam TV
मुंबई/पुणे

Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन ट्रक एकमेकांना धडकल्या; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai-Pune Expressway Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही

Mumbai-Pune Expressway Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांकडून रस्त्यावर उलटलेला ट्रक हटवण्याचं काम सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. बुधवारी (२ ऑगस्ट) महामार्गावरील खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटून अपघात झाला होता. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही तास ठप्प झाली होती.

दरम्यान, गुरूवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुन्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रक एकमेकांना धडकले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, यातील काचा वाहून नेणारा ट्रक उलटल्याने रस्त्यावर काचांचा ढीग पडला होता. पोलिसांकडून सध्या ट्रकला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबविण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT