Mumbai-Pune Expressway Traffic Block Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कधी, केव्हा आणि कुठे? वाचा

Mumbai-Pune Expressway Traffic Block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी महामार्गावर तीन दिवस ठराविक कालावधीत ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai-Pune Expressway Traffic Block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. बांधकाम सुरळीतपणे पूर्ण व्हावे यासाठी महामंडळाने २२, २३ आणि २४ जानेवारी या तीन दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत ट्रॉफिक ब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे पुलाचे गर्डर्स बसवले जाणार आहेत. या कामासाठी तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही महामार्गाच्या किमी क्र. 4/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. तिन्हीही दिवशी दुपारी ३ नंतर मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरुन सुरू राहील.

द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रॉफिक ब्लॉकच्या अनुषंगाने प्रवासाचे नियोजन करावे अशी विनंती महामंडळाने केली आहे. तसेच या कालावधीत चालकांना काही अडचण आल्यास मदतीसाठी द्रुतगती महामार्गाचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रं. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्र. 9833498334 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT