Three vehicle accident on Mumbai Pune Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Raigad Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Satish Daud

सचिन कदम, साम टीव्ही

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुसाट वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. या भयानक घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली आहे. पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने जात असतात. सुट्टीच्या दिवशी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. काही वाहनचालक बेजबाबदारपणाने वाहने चालवत असल्याने अपघातांच्या मोठ्या घटना देखील घडतात.

शुक्रवारी (ता. १०) पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ बोरघाटात पुन्हा एक भीषण अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सुसाट वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली.

अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहने महामार्गावरच आडवी झाली. त्यामुळे वाहनांच्या चक्काचूर झाला. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

अपघातातील जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT