Mumbai-Pune Expressway Traffic Jam Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: १८ तासांपासून एक्स्प्रेस वे ठप्प, पुण्यावरून मुंबईकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गँस टँकरला अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या १८ तासांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

Priya More

Summary -

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर अपघातामुळे वाहतूक ठप्प

  • बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी टँकर पलटी झाला

  • दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • पोलिसांकडून पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकरला मोठा अपघात झाला होता. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. एक्स्प्रेस वेवरील मुंबईच्या मार्गिकेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे गेल्या १८ तासांपासून एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गॅस टँकरला अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक मार्गिका खुली करून दिली तरी देखील एक्स्प्रेस वेवर अजूनही मोठी वाहतूक कोंडी आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी एकाच ठिकाणी अडकले आहेत.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात गॅस टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबई- पुणे आणि पुणे- मुंबई या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. वाहन चालकांनी चांदणी चौक ते घाट रायगड मार्गे मुंबई असा प्रवास करू शकता. आळे फाटा -माळशेज घाट -ठाणे मार्गे मुंबई असा प्रवास करू शकता महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राकडून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

असा करा प्रवास -

ताम्हिणी घाट मार्ग - पुणे- पौड- ताम्हिणी घाट- माणगाव- मुंबई

माळशेज घाट मार्ग - पुणे- चाकण- नारायणगाव- माळशेज घाट- कल्याण/ ठाणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT