Mumbai-Pune Expressway accident Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Mumbai Pune Expressway latest accident news today : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबई लेनमध्ये कंटेनर, आयशर टेम्पो आणि इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. मिसिंग लिंक तब्बल एक तास ठप्प होता.

Namdeo Kumbhar

Mumbai-Pune Expressway accident Death Toll : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि विचित्र अपघात झाला. मुंबई लेनवर तीन वाहने एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' तब्बल एक तासासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. (Mumbai-Pune Expressway Accident Container, Tempo and Car Crash)

Mumbai Pune Expressway latest accident news today

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर, आयशर टेम्पो आणि इर्टिगा कार अशा तीन वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातातील सर्व जखमींना तात्काळ खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला केली असून, सध्या वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Mumbai Pune Expressway latest accident news today

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर पंचनामा केला असून अपघात नेमका झाला कसा? याचा तपास केला जात आहे. अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सारकारी रूग्णालयात पाठवले असून पुढील तपास केला जात आहे.

Mumbai Pune Expressway latest accident news today

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT