Mumbai-Pune Expressway Accident Container overturned in Khandala tunnel traffic stopped Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटला; वाहतूक ठप्प

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असणारा ट्रेलर खंडाळा बोगद्यात उलटला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर खंडाळा बोगद्यात उलटला. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कंटेनर रस्त्यावरच आडवा झाल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या ट्रेलर हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना वाढत असताना दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा अपघात होत आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील बोगद्यात भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनर बोगद्यात आडवा झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT