mumbai pune express highway  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai- Pune Express Way: वाहन चालकांनो सावधान! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना वेग मर्यादा पाळा, नाहीतर...

Speed Limit For Travelling on Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर यापुढे आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे यापुढे वाहनचालकांना वेगमर्यादेसंदर्भातील नियमांचे पालन करावेच लागेल.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताना यापुढे वाहन चालकांना वेगमर्यादा पाळावी लागणार आहे. नाहीतर त्यांना दंड भरावा लागू शकतो. कारण यापुढे आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर करडी नजर असणार आहे. जर वेगमर्यादेसंदर्भातील नियमांचे पालन केले नाही तर वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने एआय टेक्नॉलॉजीवर आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घाट परिसरामध्ये हलक्या वाहनांची वेग मर्यादा ६० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ४० किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलक्या वाहनांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ८० किमी प्रतितास आहे. प्रणालीअंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे.

तरी सर्व वाहन धारकांनी वाहतूक करतांना सर्व नियमांचे पालन करावे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. त्यामुळे आता एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताना आयटीएमएस प्रणालीद्वारे तुमच्या वाहनाचा वेग पाहण्यात येईल आणि जर तुम्ही वेग मर्यादेचे नियम मोडले तर तुम्हाला दंड भरावाच लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT