3 Hours Block From 12 To 3 Pm on Mumbai Pune Expressway Near Khopoli Pali Phata Road Work on 30 November 2023 Mumbai To Pune Alternative Way - Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या ३ तासांचा ब्लॉक, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai-Pune Expressway Traffic Update For 30 Nov 2023: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. याच मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या म्हणजे गुरुवारी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

Mumbai-Pune Expressway Block:

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. याच मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या म्हणजे गुरुवारी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर दुपारी 12 ते 3 या वेळेत असणार वाहतुक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. (Latest Marathi News)

एक्स्प्रेस वेवर गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावरील पुलासाठी 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचं काम उद्या गुरुवारी केले जाणार आहे. या तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक केव्हा बंद राहणार?

लेनवर दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पर्यायी मार्ग कोणते?

महामार्गावर उद्या दुपारी 12 ते 3 या कालावधित पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खालापूर टोलनाका येथे 1 किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात येणार आहे.

ब्लॉकमुळे प्रवाशांची तारांबळ

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर गेल्या काही महिन्यांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडते. पुढील काही महिने देखील ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

SCROLL FOR NEXT