MUMBAI RAIN BRINGS RELIEF AS VIDARBHA FACES HEATWAVE RED ALERT AI
मुंबई/पुणे

Mumbai Rain Alert : वातावरण बदललं! मुंबईत पुढील काही तासांत धो धो पाऊस कोसळणार, IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather Update News : मुंबईत पूर्व-मौसमी पावसाच्या सरींमुळे उकाड्यातून दिलासा मिळाला आहे, तर विदर्भात उष्णतेची लाट कायम असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील काही भागांमध्ये धो धो पाऊस

  • विदर्भात उष्णतेची लाट कायम, ‘रेड अलर्ट’ जारी

  • मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण

  • २६ मेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता

  • राज्यात दोन वेगवेगळे हवामानाचे चित्र दिसून येत आहे

राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका असून विदर्भाला रेड अलर्ट देण्यात आला होता. तसेच काल पासून मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके होते. अशातच पूर्व मौसमी पावसाने मुंबईतील मुलुंड, घाटकोपर परिसरात हजेरी लावली आहे. काही काळ बरसलेल्या सरींमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील ३६ ते ४८ तासांत अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळणार असून मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या भागातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबतही संकेत दिले आहेत. नैऋत्य मान्सून सुमारे २६ मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जूनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पोहोचू शकतो.

विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. अतितीव्र उष्णतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. इतर जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा वाढलेला दिसून येत आहे.

एकूणच, राज्यात सध्या दोन वेगवेगळे हवामानाचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असताना, मुंबईसह काही भागात पावसाने हजेरी लावल्याने दिलासा निर्माण झाला आहे. आगामी काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: 'ईठा'साठी श्रद्धा कपूरची वाढली डिमांड; बायोपिकसाठी घेतले इतके कोटी?

Diabetes : फक्त साखर खाल्ल्यानेच डायबिटीस होतो का? जाणून घ्या महत्त्वाच्या ५ गोष्टी

पावसाळ्यात ओल्या केसांची चिंता सोडा! या 5 हेअरस्टाईल्स ट्राय करा

Maharashtra Live Update: नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

Election : ३ राज्यांमध्ये पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान आणि निकाल कधी?

SCROLL FOR NEXT