Hotel Bademiya  Saam Tv
मुंबई/पुणे

Hotel Bademiya : मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेलला टाळं, FDAची कारवाई; किचनमध्ये आढळले उंदीर, झुरळे

Latest Mumbai News : बडेमिया या हॉटेलच्या स्वच्छतेसंबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

दक्षिण मुंबईतील बडेमिया या प्रसिद्ध रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. एफडीएने हॉटेलवर छापा मारला त्यावेळी तपासणीदरम्यान हॉटेलमधील गलिच्छपणा उघड झाला आहे.

छापेमारीच्या वेळी हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे आणि उंदीर आढळले. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बडेमिया हॉटेल बंद केलं आहे. याआधी बडेमिया या हॉटेलच्या स्वच्छतेसंबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरच एफडीएने ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जेव्हा FDA अधिकार्‍यांनी हॉटेलच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाला. हॉटेलकडे फूड सेफटी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचं (FSSAI) लायसन्स नसल्याचंही समोर आलं. 76 वर्ष जुन्या हॉटेलकडे हे लायसन्स नसल्याने अधिकारीही चकीत झाले.

पुरेशी कागदपत्र नसतानाही बडेमिया कबाब स्पेशल हॉटेलच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथे अशा दोन शाखा सुरु होत्या. रेस्टॉरंटच्या मालकाने कारवाईनंतर बोलताना म्हटलं की, त्यांच्याकडे FSSAI वगळता सर्व परवाने आहेत, जे चालू आहे. अधिकार्‍यांच्या सूचनांचे पूर्ण पालन करण्यास ते तयार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT