Mumbai Politics: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Leader Arrested: मुंबईतील राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते गणेश चुक्कल यांना पोलिसांनी अटक केली.

Priya More
  • मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

  • मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक

  • पवई पोलिसांनी ही कारवाई केली

  • हिरानंदानीतील विकासकाची फसवणूक केल्याचा आरोप

  • २०२३ मध्ये गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता

मुंबई पोलिसांनी मनसेच्या बड्या नेत्याला अटक केली. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक करण्यात आली. हिरानंदानीत विकासकाची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२०२३ मध्ये या प्रकरणी गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी विकासकाची फसवणूक केली होती आणि खंडणी मागितली होती. विकासकाने पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांच्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात याआधी देखील पोलिसांनी फवसणुकीचा गुन्हा दाखल केला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीच्या कंपनीने त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पवईतील हिरानंदानी गार्डन्समधील एका इमारतीमधील फ्लॅटच्या करारावरून अक्षय कुमारच्या बहिणीच्या कंपनीने गणेस चुक्कल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. अक्षय कुमारच्या बहिणीचा एक फ्लॅट गणेश चुक्कल यांना तीन वर्षांच्या भाडेकरारावर दिला होता. भाडेकरारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट रिकामा करायचा होता पण त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत हे प्रकरण कोर्टात गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रदीप पूर्णेकर हत्येपूर्वीच्या दोन दिवसांत काय घडलं? राम पूर्णेकरांच्या जबाबातून महत्त्वाचा खुलासा

Dark Chocolate vs Regular Chocolate: डार्क चॉकलेट की चॉकलेट्स आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? वाचा...

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातापूर्वीचा थरारक VIDEO समोर, ७ जणांनी गमावले प्राण

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटना प्रकरणी विनर्स अकॅडमी सील; आळंदी नगरपरिषदेची कारवाई

Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?

SCROLL FOR NEXT