MNS leader and Mumbai city president Manoj Gharat joins BJP, creating a major political twist ahead of BMC elections. Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra Politics: मुंबई निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीनंतर मनसेला मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Bharat Jadhav

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला देखील वेग आलाय. आज मुंबईमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेसह इतर काही महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झालीय. त्यामुळे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय. मात्र दुसरीकडे राज ठाकरेंच्या शिलेदारानं पक्षाला रामराम ठोकलाय.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत मनसेनं युती केलीय. मात्र या युतीनंतर मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत मनसेनं युती केली. मात्र या युतीनंतर मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता आणखी एका नेत्यानं भाजपात प्रवेश केलाय. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मनोज घरत यांनी भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेमधून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, अखेर त्यांनी आता भाजपात प्रवेश केलाय. आज डोंबिवलीमधील गोपी चौक परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “मनोज घरत हे माझे जुने मित्र आहेत. त्यांना आमच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न मी अनेकदा केला होता. अखेर आज ती वेळ आली आहे.” मित्र जास्त काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाहीत, असे सांगत त्यांनी पुढे सूचक वक्तव्य करत म्हटले की, “मला खात्री आहे की मोठा मित्रही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल; फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आहे.”रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, तो मोठा मित्र किंवा मोठा भाऊ नेमका कोण, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मनसेमधील कोणता मोठा नेता आता भाजपात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनोज घरत यांनी आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, गेल्या वीस वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर हा निर्णय जड अंतःकरणाने घेतला आहे. केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असून विकासकामांसाठी निधी मिळावा, तसेच सहकाऱ्यांच्या भावना जपाव्यात, या उद्देशाने आपण भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणी कायम राहतील, असे सांगत त्यांनी भाजपमध्ये मिळेल त्या जबाबदारीने काम करण्याची भूमिका मांडली.या घडामोडींमुळे कल्याण–डोंबिवलीच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून, येत्या दिवसांत आणखी कोणकोणते मोठे चेहरे भाजपमध्ये प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT