पोलीस
पोलीस  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Mumbai : कल्याणमध्ये पोलिसांनी केली पोलिसांवर कारवाई!

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु आहे. नो पार्किंगचा फलक लावून सुद्धा या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जात आहेत. विशेष म्हणजे यात पोलिसांच्या गाडयांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून आज कल्याण वाहतूक  पोलिसांनी पोलिसांच्या गाडय़ांच्या विरोधात  कारवाईचा बडगा उगारला आणि  100 हुन अधिक पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे.

हे देखील पहा :

या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असते. इथे वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम वाहतूक पोलिस नेहमीच करीत असतात. मात्र, नो पार्किगमध्ये उभ्या केलेल्या गाड्यामध्ये पोलिसांच्या गाड्या जास्त असल्याचे ट्रॅफिक पोलिसांना आढळून आले. मात्र गाड्यांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांसमोर पेच निर्माण होत होता. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात असल्याने कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी या बेशिस्त गाड्या पार्किंगविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन परिसरात नो पार्किग झोनमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली गेली. यामध्ये 100 हून अधिक पोलिसांच्या गाड्यांवर ई-चलानच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. या पुढे गाड्या उभ्या करुन अडथळा निर्माण करु नये आणि रेल्वेच्या पार्किंगमध्येच गाड्या पार्क कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KL Rahul Statement: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Nashik Bank Robbery | ICICI होम फायन्सास कंपनीच्या शाखेत चोरी,लॉकरमधील 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

SCROLL FOR NEXT