Mumbai Police Recruitment , File Photos Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Police Recruitment: सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर; मुंबई पोलीस भरतीत ८५०० जागांसाठी ६ लाखांहून उमेदवारांचे अर्ज

Mumbai Police Recruitment: देशात लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आलं आहे

Vishal Gangurde

Mumbai News: संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं असलं तरी देशासहित राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर होत आहे. मुंबई पोलीस भरतीत ८५०० जागांसाठी साडे सहा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आलं आहे. देशात लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आलं आहे. (Latest Marathi News)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार , भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. भारतात युवकांची (Youth) संख्या मोठी असल्याचे पुढे आलं आहे. त्यामुळे देशात युवकांसाठी नव्या रोजगारांची संधी निर्माण करणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे.

ग्रामीण भागात नोकरीच्या संधी कमी असल्यामुळे अनेक तरुणांना नोकरीसाठी शहराकडे स्थलांतर करावं लागत आहे. त्यामुळे अनेक तरुणांचा ओढा मुंबईकडे असतो. तर अनेक तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. याचदरम्यान, मुंबई भरतीत ८५०० जागांसाठी ६५०००० जणांनी अर्ज दाखल केल्याचे वास्तव समोर आले आहे.

पोलिस भरतीसाठी मुंबईत आलेल्या सुनिल याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी तिसऱ्यांदा पोलिस (Police) भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. २०० किलोमीटर प्रवास करत मुंबईत भरतीसाठी आलो आहे'.

'मला पोलीस खात्यात नोकरी मिळाल्यास माझं आयुष्य बदलेल. मला एक निश्चित उत्पन्न मिळेल. तसेच नोकरीची सुरक्षा राहील, मी लग्न करण्यासाठी देखील पात्र ठरेल', असं मत सुनिलने व्यक्त केलं. देशाची अर्थव्यवस्थेत बदल होत असताना बेरोजगारीची मोठी समस्या देशात भेडसावत असल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT