Manoj Jarange Patil Saam TV News
मुंबई/पुणे

Manoj Jarange : आझाद मैदान खाली करा, पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, आंदोलनाला परवानगी नाकारली

Manoj Jarange protest Azad Maidan notice : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारून नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांची कारवाई, आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

  • मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारून मैदान खाली करण्याची नोटीस बजावली.

  • नियमांचे उल्लंघन आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

  • आंदोलन पाचव्या दिवशी पोहोचले असून, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे.

  • पोलिसांच्या नोटीसमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Manoj Jarange Azad Maidan Protest Notice : लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या नोटीसनंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे मराठा आंदोलकांच्या नजार खिळल्या आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे आता पोलिसांच्या नोटीसनंतर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Mumbai police notice to Manoj Jarange)

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस पाठवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. पोलिसांच्या या नोटीसनंतर आता मराठा आंदोलक काय भूमिका घेतात? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यात आता पोलिसांची नोटीस आली आहे.

Manoj Jarange protest Azad Maidan notice

आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तवयाचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Gondia Medical Collage : गोंदिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग; रुग्णालयात नागरिकांची पळापळ

Maharashtra Flood: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IMD Warns : आभाळ फाटल्यासारखा पाऊस, जिकडे-तिकडे पाणीच पाणी, कंरट लागल्यामुळे ७ जणांचा मृत्यू

Crime News : घटस्थापनेच्या दिवशी अघटित घडलं! देवीच्या उत्साहात तल्लीन असलेल्या पाच तरुणांवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT