Woman Attack on Devendra Fadnavis Office Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis Office: ती राडेबाज महिला मानसिक रुग्ण, सोसायटीतही घातला होता धुमाकूळ; अनेक VIDEO आले समोर

Satish Kengar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाची तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. ही महिला दादरमधील एका सोसायटी सोसायटीतील रहिवासी आहे. धनश्री, असं या महिलेचे नाव असल्याचं समजतं आहे. या महिलेने याआधी सोसायटीतही धुमाकूळ घातला होता. ज्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. सोसायटीमधील राशिवाश्यांचं म्हणणं आहे की, ही महिला सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरते. याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

याच महिलेचा आता एक व्हिडिओही समोर आला आहे. जो या महिलेच्या सोसायटीतीमधील आहे. या व्हिडिओत ही महिला तिच्या शेजारील घराच्या दारावर झाडूने प्रहार करताना दिसत आहे. तसेच ही महिला या व्हिडिओत खूपच रागात असल्याचं पाहायला मिळत आहे. धनश्री या घराच्या दाराच्या शेजारी भिंतीवर असलेल्या डोअर बेलवर झाडूने प्रहार करताना देखील दिसत आहे.

याच सोसायटीमध्ये राहत असलेल्या एका महिलेने धनश्रीबद्दल माहिती देताना सांगितलं की, धनश्री ही या दादरमधील सोसायटीतील तिच्या घरी एकटीच राहते. तसेच ती अविवाहित आहे. या महिलेला आधीपासूनच मानसिक आजार असू शकतो. धनश्रीसोबर आधी तिची बहीण राहत होती. मात्र धनश्री अशाच प्रकारे वागत असल्याने तिची बहीणही आता घरसोडून गेल्याच सोसायटीमधील या महिलेने धनश्रीबद्दल माहिती देताना सांगितलं.

याआधी धनश्रीने सोसायटीत खूप धुमाकूळ घातला आहे. तिने अनेकवेळा सोसायटीत तोडफोड केली आहे. तसेच तिने सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेराचीही तोडफोड केली आहे. धनश्रीला उपचारांची गरज असल्याचं तिच्या सोसायटीमधील लोकांचं म्हणणं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया?

या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''महिलेनं तोडफोड का केली हे समजून घेऊ'', असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी आता पोलीस धनश्री हिच्या घरी दाखल झाले आहेत. पोलीस तिला समाज देण्यासाठी गेल्याच सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, धनश्री विरोधात कोणताही गुन्हा अद्याप दाखल नसल्याने ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Curry Leaves: रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Health Tips: पोट साफ होण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा...

Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

SCROLL FOR NEXT