Maharashtra Police Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: पोलिसांकडून तक्रारदारांना दसरा भेट, सरप्राईजनंतर 'त्या' लोकांचा आनंद गगनात मावेना

Mumbai News: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाइल शोधून मूळ मालकांना परत करत तक्रारदारांना दसरा भेट दिली आहे.

Vishal Gangurde

Mumbai Crime News:

मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला की, अनेकांना परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे अनेक जण पोलिसांत तक्रार नोंदवण्यासही टाळाटाळ करतात. मात्र, मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाइल शोधून मूळ मालकांना परत करत तक्रारदारांना दसरा भेट दिली आहे. (Latest Marathi News)

दिंडोशी पोलिसांना गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले तब्बल २५१ मोबाइल पुन्हा मूळ मालकांना परत देण्यास यश आलं आहे. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत सर्व मोबाइल चोरांकडून हस्तगत केले. त्यानंतर पोलिसांनी मूळ मालकांना मोबाइल परत दिले. या सर्व मोबाइलची किंमत अंदाजे ४२,५०,००० रुपये इतकी असल्याचे बोलले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोबाइल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, दिंडोशी पोलिसांनी तब्बल 251 मोबाइल फोनचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले. महत्वाचे म्हणजे हे सर्व मोबाइल महागडे होते.

दिंडोशी पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवली. तांत्रिक कौशल्याच्या आधारावर तपास करत चोरी गेलेले मोबाइल हस्तगत केले. मोबाइल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून स्मिता पाटील पोलीस उपायुक्त झोन 12, दिंडोशी पोलीस ठाण्याचे व.पो.नि जीवन खरात यांनी परत केले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) धनंजय कावडे, सपोनि.डॉ. चंद्रकांत घार्गे, पोउनि.अजित देसाई, स.फौ. शाम रणशिवरे पोह. नवनाथ बोराटे, शंकर माईंगडे, हेमंत रोडे, अजित चव्हाण, दत्तात्रय गुजर, सचिन कांबळे, राहुल पाटील, पो.शि. सागर तामकर, विलास जाधव, व्होनप्पा दापुरे, सचिन पोटे, दिपक गायकवाड आणि पोहवा सागर पवार यांनी तपास पथकाने हे सर्व मोबाइल हस्तगत करून फिर्यादींना परत केले.C

चोरीतील मोबाइल परत मिळाल्यावर दिंडोशी पोलिसांनी तक्रारदारांना मोबाइल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. गेलेला मोबाइल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाइल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. मोबाइल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी दिंडोशी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT