Kishori Pednekar Saam Tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar News : किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात FIR दाखल; अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?

किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात 'एसआरए' प्रकरणी मुंबईत एफआयआर दाखल झाला आहे.

जयश्री मोरे

Kishori Pednekar News : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात 'एसआरए' प्रकरणी मुंबईत एफआयआर दाखल झाला आहे. वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आला आहे. पेडणेकर यांच्यावर फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. (Latest Marathi News)

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर ,कुटुंबातील सदस्यासहित किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर (Kishori Pendekar) यांची काही दिवसांपूर्वी 'एसआरए'योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाई झाली होती. त्याचबरोबर पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले होते. आता पेडणकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याने त्यांना मोठा धक्का समजला जात आहे.

किशोरी पेडणेकर यांना याप्रकरणी कोर्टाकडून समन्स देखील जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक होताना दिसले.

सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर आरोप करताना म्हणाले, 'किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य फसवणुकीत सहभागी आहेत. किशोरी पेडणेकर,त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ,किश किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि अन्य चार जणांच्या विरोधात २०१२ मध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी समन्स जारी करण्यात आले होते. त्यांच्या कंपनीला कोविड काळाच कोटींचे कंत्राट मिळाले. कोर्टाने आरोपींना ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT