Protest against Shah Rukh Khan saam tv
मुंबई/पुणे

Protest against Shah Rukh Khan: ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या विरोधात आंदोलन; 'मन्नत' बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Protest against Shah Rukh Khan: ऑनलाइन जुगार अॅपची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या विरोधात अनटच इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

Vishal Gangurde

संजय गडदे

Protest against Shah Rukh Khan:

ऑनलाइन जुगार अॅपचे धुमाकूळ घातला आहे. या अॅपच्या माध्यमातून पैशे जिंकण्याचे आमिष दाखवले जाते. या ऑनलाइन जुगारामुळे अनेक जण पैसे हरतात. ऑनलाइन जुगार अॅपमध्ये पैसे हरल्याने अनेक तरुण जीवनही संपवतात. याच ऑनलाइन जुगार अॅपची अनेक सिनेअभिनेते जाहिरात करतात. या ऑनलाइन जुगार अॅपची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या विरोधात अनटच इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. (Latest Marathi News)

ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. ऑनलाइन जुगाराच्या जाहिरातीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

अनटच इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टॅन्ड परिसरातील मन्नत या शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. गळ्यात भगवा गमछा घालून आंदोलन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शाहरुख खान, अजय देवगण आणि हृतिक रोशन असे अनेक बॉलीवूड अभिनेते ऑनलाइन जुगाराच्या अॅपची जाहिरात करत आहेत.या अभिनेत्यांना अनेक जण खऱ्या आयुष्यात हिरो मानतात. यातील अनेक जण त्यांचे अनुकरण देखील करत असतात.

या अभिनेत्यांकडून ऑनलाइन जुगाराची जाहिरात केली जात असल्याने अनेक जण या खेळात गुरफटले आहेत. परिणामी अनेक जणांचे नुकसान देखील झाले. त्यामुळे अनटच इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने शाहरुख खानच्या मनात बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले. या संस्थेचं आंदोलन सुरू असतानाच वांद्रे पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात नेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT