कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासाला मुंबई पोलिसांनी लावला ब्रेक  Saam Tv
मुंबई/पुणे

कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासाला मुंबई पोलिसांनी लावला ब्रेक

पुजा ददलानीने अद्याप मुंबई पोलिसांसमोर जबाब न नोंदवल्याने पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे दिसत आहे.

सूरज सावंत

मुंबई - बहुचर्चित कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासाला मुंबई पोलिसांनी ब्रेक लावला आहे. पुजा ददलानीने अद्याप मुंबई पोलिसांसमोर जबाब न नोंदवल्याने पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलीस कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसईटी तयार करण्यात आली होती.

हे देखील पहा -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली आणि लाच प्रकरणामध्ये ददलानीचा जबाब फार महत्वाचा आहे. ती समोर येत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र तिने प्रकृतीचे कारण सांगून उपस्थित न राहता वेळ मागून घेतली. त्यामुळे पोलिसांना तिचा जबा अद्याप नोंदवता आला नाही.

मुंबई पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेण्याव्यतिरिक्त गेल्या महिन्यातच SET तयार केली होती. परंतु जोपर्यंत पूजा पोलिसांना जबाब देत नाही, तोपर्यंत या प्रकरणी एफआयआर नोंदवता येणार नाही. कारण SET फक्त करण्यात आलेल्या आरोपाची सत्यता पडताळत आहे. याबाबत अद्याप कोणत्याही गुन्हा नोंदवलेला नाही. या कारणास्तव, मुंबई पोलिसांनी SET तपास सध्या थांबवला आहे आणि कायदेशीर सल्ला घेत आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणाचे स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर शैल यांनी आरोप केला होता की, केपी गोसावी याने आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढ्यासाठी पूजा ददलानीकडून पैसे घेतले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

SCROLL FOR NEXT