ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे केळीच्या सालीचेही अनेक आरोग्यदायी फायदे असतात.
पण केळीची साल खाणे कोणालाही आवडंत नाही, मग तिचे सेवन कसे करावे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
तुम्ही केळीच्या सालीचे कुरकुरीत आणि मसालेदार चिप्स बनवू शकतात.
यासाठी काही कच्च्या केळीची साले काढून घ्या.
साली स्वच्छ पाण्याने धुवा आणि हवी तशी चिरून घ्या.
चवीनुसार मीठ आणि थोड्या पाण्याचे मिश्रण तयार करून काळजीपूर्वक गरम तेलात टाका.
चिरलेली केळीची साले गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले चिप्स अधिक कुरकुरीत राहण्यासाठी टिशू पेपरच्या मदतीने अतिरिक्त तेल काढून टाका.
चिप्सवर हवे असलेले मसाले आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. सर्व्ह करा.