मुंबई: मुंबई पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळल्याचा आरोप होऊन एक वर्षही उलटले नाही. याच आरोपातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. मात्र आता पोलिसांवर (Mumbai Police) रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत. मुंबईत असे अनेक बार मालक आहेत ज्यांचा आरोप आहे की पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावर झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. काही मालक असा आरोप करतात की त्यांचे बार पहाटे 1.30 च्या अंतिम मुदतीपूर्वी बंद करण्यास सांगितले जाते.
हे देखील पहा -
काही डान्सबार (Dance bar) मालकांचा असाही आरोप आहे की, पोलिस त्यांच्याकडे येतात आणि त्यांना त्रास देतात, त्यांना पोलीस सांगतात की, त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे ज्याचे ते पालन करत आहेत. मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा (Orchestra Bar) आणि डान्स बार आहेत. बारमालकांनी याबाबत AHAR (Indian Hotel & Restaurant Association) कडे तक्रार केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, पोलिस रात्री नऊ वाजल्यापासूनच फेऱ्या मारायला लागतात. पोलिस महिला डान्सर आणि गायकांचे फोटो काढू लागतात, त्याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होतो आणि ग्राहकही खूप घाबरले त्यामुळे ते जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर निघून जातात. दुसऱ्या एका हॉटेल व्यापाऱ्याने सांगितले की, अनेकवेळा पोलिस गणवेशात येतात आणि झोपायलाही जातात.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.