Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News : मुंबईतील दहिसर पोलिसांनी ‘BitxStaking’ क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली ६.५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • दहिसरमध्ये ‘BitxStaking’ क्रिप्टो गुंतवणूक स्कॅमचा भंडाफोड

  • सुमारे ६.५० कोटी रुपयांची फसवणूक

  • मुख्य आरोपीला अटक

  • २००० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील दहिसर पोलिसांनी मल्टीलेव्हल मार्केटिंग आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. ‘BitxStaking.com’ या कथित क्रिप्टो गुंतवणूक योजनेद्वारे सुमारे 6 कोटी 50 लाख रुपयांची ठगी केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत शंकरराव जाधव (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दहिसर पोलिसांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अहमदाबाद विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले. आरोपी थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणातील इतर ८ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपासात उघड झाले की, आरोपीने SJAB Digital Solution LLP या कंपनीच्या नावाने गुंतवणूकदारांना मोठ्या आणि जलद परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांकडून पैसे ICICI आणि YES बँकेतील खात्यांमध्ये जमा करून घेतले जात होते. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०२१ ते २०२२ या कालावधीत १८ गुंतवणूकदारांकडून १ कोटी १६ लाख ४२ हजार ८६० रुपये उकळण्यात आले. मात्र संपूर्ण नेटवर्कमध्ये सुमारे २००० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना जोडून तब्बल 6.50 कोटी रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी अचानक योजना बंद करून संपर्क तोडला.

विशेष म्हणजे, फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुजीत जाधवने मोबाईल आणि यूट्यूबच्या मदतीने हे सॉफ्टवेअर तयार केले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. काही काळापूर्वी अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला बेडरेस्ट सांगितले होते. त्याच काळात त्याने ऑनलाइन माध्यमातून सॉफ्टवेअर तयार करण्याची माहिती घेतली आणि ‘BitxStaking’ नावाचे प्लॅटफॉर्म विकसित केले. त्याद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. ठगीच्या पैशातून आरोपीने अहमदाबादमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात समोर आले असून पोलिसांनी ती मालमत्ता जप्त केली आहे.

या प्रकरणी दहिसर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती क्राइम पोलिस निरीक्षक अशोक नाना घुगे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : अंगदुखीची कारणे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहान Live कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक रडू लागली, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT