mumbai police attack :  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

mumbai police attack : मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत.

Vishal Gangurde

अमली पदार्थ प्रकरणात तपासासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर हल्ला

आठ हल्लेखोरांकडून तलवार, चॉपर, हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला

हल्ल्यात चार जण जखमी, तातडीने रुग्णालयात दाखल

अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणात संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर आठ जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ८ जणांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस मित्र जखमी झाले. या पोलिसांना तातडीने रुग्णालयात पाठवून उपचार सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर उलवे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हल्लेखोरांकडे चॉपर, तलवार, हॉकी स्टिक फायटर पंच आढळले आहे. एका हल्लेखोराकडे गावठी कट्टा आढळला. शाहिद खान, आयाज खान, आसिफ खान,इस्माईल शेख,मेहराज असे संशयित आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलीस विभागातील अमली पदार्थ विरोधी पथकावर हा हल्ला झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पथकातील कर्मचारी शनिवारी रात्री उलवा परिसरात अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपीच्या शोधात होते. त्यावेळी संशयित आरोपी उलवा सेक्टर १९ येथील शगुन चौकात आढळले. त्यावेळी काहींच्या संशयास्पद हालचाली होत्या. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पथक गेलं. परंतु या संशयित आरोपींना पोलिसांवर हल्ला केला.

हल्लेखोरांनी चॉपर, गावठी कट्टा, तलवार, फायटर पंच, हॉकी स्टिकने हल्ला केला. संशियत आरोपी हल्ला करतील, त्यांना वाटलेच नव्हते. हल्लेखोरांच्या हल्ल्यात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस मित्र फिरोज सिद्धीकी, अहमद रजा कुरेशी, आणि अतुल जैस्वाल जखमी झालेत. या प्रकरणी संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, पथकातील कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना कळवले नव्हते. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत न घेता कारवाईसाठी पोहोचले होते, यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर हल्लेखोरांना पोलीस पथक असल्याची माहित नसल्याने हल्ला केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT