Mumbai police arrested two drug smugglers Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५ कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त

या तस्करांकडून १ किलो ९३५ ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली आहे. या तस्करांना मुंबई पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखा युनिट ३ ने मानखुर्द परिसरातून अटक केली. या तस्करांकडून १ किलो ९३५ ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५ कोटी ८० लाख रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. गुन्हे शाखेने एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. (drug smugglers)

शाळकरी मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून हे तस्कर ड्रग्ज तस्करी करत होते, अंमली पदार्थांच्या तस्करीचा हा नवा मार्ग तस्करांनी सुरू केल्याचे पोलिसांनी सा़ंगितले. या प्रकरणी मानखुर्द भागातून एका महिलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही महिला बऱ्याच दिवसांपासून अंमली पदार्थांच्या व्यवसाय करत होती, गेल्या 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा त्या महिलेवर पाळत ठेवून होती. महिलेसहअन्य एका आरोपीलाही पोलिसांनी (Police) या प्रकरणात अटक केली असून अधिकतपास पोलिस करत आहेत. (drug smugglers)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT