gondia, police, arrests, naxals Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: आधी पत्नीला संपवलं आणि 5 वर्षांनंतर तिच्या बॉयफ्रेंडला, नवऱ्याने का रचला हत्येचा कट

Mumbai Police: आरोपीला पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

Priya More

सूरज सावंत, मुंबई

Mumbai News: अनैतिक संबंधातून (Extra Marital Affair) पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीने 5 वर्षांनंतर तिच्या प्रियकरालाही संपवले आहे. मुंबईच्या डोंगरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी (J J Marg Police) आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मुळचा बिहारचा (Bihar) आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटका आल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराची देखील हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या डोंगरी परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धर्मा नाडर (42 वर्षे) या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी आरोपी ब्रिजेश प्रसाद (39 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपीला 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये पत्नीचे आणि धर्माचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यानंतर संतप्त होत त्याने पत्नीची हत्या केली होती. त्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली होती. त्यावेळी आरोपी ब्रिजेशने त्याच्या पत्नीचा प्रियकर असलेल्या धर्मा नाडरची देखील हत्या करण्याची धमकी दिली होती. पत्नीच्या हत्या प्रकरणी ब्रिजेशला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी ब्रिजेशने बुधवारी डोंगरी इमामवाडा येथे धर्माची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ब्रिजेश प्रसादला अटक केली. धर्मा नाडर हा ब्रिजेश प्रसादच्या हाताखाली सफाई कामगार म्हणून काम करत होता. धर्माचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाल्यानंतर ब्रिजेशने संतप्त होत आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने धर्माची हत्या केली. या घटनेचा तपास जे. जे मार्ग पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT