Mumbai Police
Mumbai Police Saam Tv
मुंबई/पुणे

दोन कोटी ८० लाखांच्या कॅश व्हॅनसह चालक फरार, मुंबई पोलिसांना मिळाली खबर, त्यानंतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली होती. एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्या सीएमएस कंपनीच्या एका व्हॅनमध्ये दोन कोटी ८० लाखांची रक्कम लंपास करून चालक फरार झाला होता. या घटनेबाबत पोलिसांना (police) माहिती मिळताच तपासाची सूत्र वेगाने फिरवत फरार आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. उदयभान सिंग (culprit arrested) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. ( Mumbai crime latest news update)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उदयभान सिंगने व्हॅनमधील दोन कोटी ८० लाख रुपये लंपास करून तो फरार झाला होतागोरेगाव फिल्मिस्तान स्टुडिओ जवळ सोडली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांकडून आठ तपास पथके तयार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.

त्यानंतर मुख्य आरोपी उदयभान सिंगला गोरेगाव पोलिसांनी वसई येथून अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली. तसेच आरोपी सिंगचे साथीदार आकाश उर्फ राजू यादव, ऋषिकेश सिंहला दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून ८० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toyota Cars: मोठ्या फॅमिली साठी बेस्ट आहे ही कार, Toyota Rumion भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

SCROLL FOR NEXT