अश्लील फोटो दाखवून सायबर खंडणी उकळणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी केली गुजरातमधून अटक Saam Tv News
मुंबई/पुणे

अश्लील फोटो दाखवून सायबर खंडणी उकळणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी केली गुजरातमधून अटक

मुंबईच्या मलबार हिल पोलिसांनी सायबर खंडणी (सेक्सटॉर्शन) प्रकरणी तिघांना गुजरातहून अटक केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या मलबार हिल पोलिसांनी सायबर खंडणी (एक्सटॉर्शन) प्रकरणी तिघांना गुजरातहून अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत आरोपींनी सायबर खंडणीचा सर्व पैसा आभासी चलनात (क्रीप्टोकरन्सी) करन्सीमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झाले आहे. (Mumbai police arrest cyber ransom seekers from Gujarat)

हे देखील पहा -

परदेशातून आरोपींच्या संपर्कात असलेल्या नायजेरीयन आरोपींना आभासी चलनामार्फत ती हस्तांतरीत करण्यात आल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मलबार हिलमधील ३२ वर्षीय व्यावसायिक घरामध्ये आंघोळ करत असताना त्याला एक व्हिडिओ कॉल आला होता. त्याने तो उचलला असता आरोपींची त्याचे नग्न चित्रीकरण केले. २८ जूनला घडलेल्या या प्रकारानंतर तक्रारदार व्यावसायिकाला त्याचे चित्रीकरण पाठवून आरोपींनी खंडणीची मागणी केली होती. अन्यथा हे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदार यांनी ३७ हजार रुपये आरोपींना पेटीएमद्वारे पाठवले होते. पण त्यानंतरही आरोपींनी धमकावणे बंद केले नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या तक्रारदाराने अखेर याप्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली.

त्यानुसार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपींसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती पोलिसांनी घेऊन ते सर्व व्यवहार गुजरातमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शैलेश भाटी, सवाईलाल दर्जी व जसराज दर्जी यांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

Maharashtra Live News Update: अजितदादाचं पक्षात काही चालत नाही; बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर प्रहार

Sara Ali Khan Boyfriend: सारा अली खान 'या' भाजप नेत्याच्या मुलालासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही हे दुर्भाग्य; PM मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, VIDEO

SCROLL FOR NEXT