Ravindra Waikar News Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Waikar News : खासदार रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ? उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने केला मोठा दावा

Ravindra waikar News update : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने केलेल्या दाव्याने खासदार रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढलं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी जिंकले. मात्र, रवींद्र वायकर यांच्या विजयावर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली. तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. या मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने मोठा दावा केला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरील गोंधळसंदर्भातील आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर हे मतदारसंघातील आणखी एका अपक्ष उमेदवाराचे पोलिंग एजंट म्हणून काम पाहत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केला आहे. अपक्ष उमेदवाराच्या दाव्यामुळे उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अपक्ष उमेदवाराच्या दाव्यानंतर पांडीलकर यांच्याकडे दोन-दोन उमेदवारांचे पोलीस एजंट कार्ड कसे आले, तसेच अपक्ष उमेदवारांच्या पोलिंग एजंटच्या ओळखपत्रावर वायकरांचं काम करत होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अपक्ष उमेदवार भरत शहा यांचा आरोप काय?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरणारे रवींद्र वायकर यांचे मेव्हणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांच्या नावे पोलिंग एजंटचे कार्ड असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिंग एजंट हा दोन्ही उमेदवारांचं ओळख पत्र घेऊन मतमोजणी केंद्रावर काम करत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केला आहे. अपक्ष उमेदवार भरत शहा यांच्या आरोपानंतर रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT