Mumbai Aray area bike accident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Accident : वाऱ्याच्या वेगाने दुचाकी पळवली, नियंत्रण सुटताच तिघांनी गमावला जीव; आरे परिसरातील घटना

Mumbai Aray area bike accident : मुंबईतल्या आरे जंगलातील बिरसा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

मुंबईतल्या आरे जंगलातील बिरसा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. वाऱ्याच्या वेगाने जाणारी दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राधेश्याम अशोक दावंडे (वय 34) विवेक लालमन राजभर (वय 24) आणि रितेश शिवाजी साळवे (27 वर्ष) अशी अपघातात (Accident) मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केलाय.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण दुचाकीवरून सुसाट वेगाने जात होते. तिघांपैकी एकाच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. दरम्यान, आरे जंगलातील बिरसा चौकात त्यांची दुचाकी आली. काळ्याकुट्ट अंधारात चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट विजेच्या खांबाला धडकली.

अपघात इतका भीषण होता, की परिसरात मोठा आवाज झाला. दुचाकीची खांबाला धडक बसताच तिन्ही तरुण 10 ते 15 फुट हवेत उडाले. यातील 2 तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी एडीआर दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केलाय. 3 तरण्याबांड पोरांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT